दिवंगत उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचा जयंती दिन

महाआरोग्य सेवा अभियान

दिनांक : 22/07/2026

दिनविशेष : “दिवंगत उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचा जयंती दिन” … 💐🙏

दिवंगत उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या जयंती दिना निमित्त जनसेवा सप्ताह अंतर्गत आज दिनांक 22/07/2026 पासून ते दिनांक 28/07/2026 पर्यंत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली सेंट जॉर्जेस रुग्णालय मुंबई च्या वतीने “महाआरोग्य सेवा अभियानाचे” आयोजन करण्यात आलेले आहे.

यामध्ये रक्तदान शिबिर, स्तन कर्करोग तपासणी शिबिर, बोन मिनरल डेन्सिटी (BMD) व आरोग्य विषयक जनजागृती इ. आरोग्य सेवा विषयक कार्यक्रमांचा सामावेश आहे.

स्थळ : सेंट जाॅर्जेस रूग्णालय, मुंबई 01.

संयोजक : मा. अधिष्ठाता, ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज.जी.समूह रूग्णालये, मुंबई.08.

सदरील महाआरोग्य सेवा अभियानाच्या माध्यमातून झालेल्या रूग्णसेवेची आज दि. 22/07/2026 ची आकडेवारी खालील प्रमाणे आहे …

कार्यक्रम तपशील
रक्तदान शिबिर बी.डी.डी. चाळ क्रमांक – 66, मुंबई रहिवाशी संघ, भगोजी वाघमारे मार्ग, वरळी, मुंबई – 18.
येथे सेंट जॉर्जेस रुग्णालय, मुंबई च्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून
रक्तदात्यांकडून 21 बॅग रक्तदान करण्यात आलेले आहे.
आर्थोपेडीक विभाग,
सेंट जॉर्जेस रुग्णालय, मुंबई.
रूग्ण तपासणी (बोन मिनरल डेन्सिटी- BMD)
रूग्ण संख्या – 134
सर्जरी विभाग,
सेंट जाॅर्जेस रूग्णालय, मुंबई.
स्तन कर्करोग तपासणी
रूग्ण संख्या – 72