25

Jun 20

!! अभिमानास्पद !! … “सेंट जॉर्जेस रूग्णालयाचे कर्मचारी श्री राजू चव्हाण यांचे थेट मुख्यमंत्र्यांकडून कौतुक”.

सेंट जाॅर्जेस रूग्णालयाचे कर्मचारी श्री राजू चव्हाण हे टेलीफोन ऑपरेटर आहेत. ते डोळ्यांनी अंध आहेत. श्री राजू चव्हाण हे डोळ्यांनी जरी अंध असले तरी आपल्या कर्तव्याच्या बाबतीत मात्र ते व्यापक दृष्टीने पाहणारे एक आदर्श व दृष्टे कर्मचारी आहेत. अंध असून देखील त्यांनी कोविड च्या या महाभयंकर कालावधीत देखील एकही सुट्टी न घेता आपल्या टेलीफोन ऑपरेटींगच्या माध्यमातून रूग्णालयास त्यांनी जे योगदान दिलेले आहे ते खरोखरच लाजवाब आहे. याचीच दखल घेवून आपल्या राज्याचे मा. मुख्यमंत्री साहेब आदरणीय श्री उध्दवजी ठाकरे साहेब यांनी व्यक्तीशः फोन करून दूरध्वनी चालक श्री राजू चव्हाण यांचे भरभरून कौतुक केले आहे व शाबासकी दिलेली आहे आणि ही बाब सेंट जाॅर्जेस रूग्णालयाच्या दृष्टीने अतिशय अभिमानास्पद व रूग्णालयाच्या नावलौकिकात भर टाकणारी आहे. यात शंका नाही. यास्तव रुग्णालयाचे मा.अधीक्षक साहेब डाॅ. आकाश खोब्रागडे सर यांनी टेलिफोन ऑपरेटर श्री राजू चव्हाण यांचे व्यक्तिश: व समस्त सेंट जाॅर्जेस रूग्णालया च्या वतीने त्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत.  सेंट जाॅर्जेस रूग्णालयातील इतर कर्मचारी, डाॅक्टर्स, स्टाफ नर्सेस, सफाई कामगार, तंत्रज्ञ हे सर्वच जण कोविड च्या या लढ्यात आपले सर्वोत्तम योगदान देण्याचा नक्कीच मनापासून प्रयत्न करित आहेत. यात शंका नाही. या सर्वांचेच मनापासून कौतुक व आभार. 💐
Read More