मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

📚 मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

"मराठी भाषा संवर्धन पंधरवडा" निमित्त दिनांक 03/02/2026 रोजी सेंट जॉर्जेस रुग्णालय, मुंबई. (मेन ओपीडी हाॅल) येथे मा. अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाने "मराठी भाषा संवर्धन" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.

मराठी भाषेचे जतन, संवर्धन आणि मराठी भाषेचा दैनंदिन जीवनातील वापर वाढवण्याच्या उद्देशाने काव्यवाचन, कथाकथन व वकृत्व इत्यादींचे नर्सेस व नर्सिंग विद्यार्थी यांच्याकडून भाषा संवर्धनपर सादरीकरण करण्यात आले.

सदरील कार्यक्रम प्रसंगी निवासी वैद्यकीय अधिकारी, अधीसेविका मॅडम, नर्सेस, नर्सिंग विद्यार्थी व इतर मान्यवर उपस्थित होते.