सेंट जॉर्जेस रुगणालयात आता अत्याधुनिक क्ष-किरण (x-ray) यंत्र प्रणाली सुविधा उपलब्ध

आज दिनांक 12 जाने. 2021 रोजी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई चे संचालक पद्मश्री डाॅ.तात्याराव लहाने सर व सर ज.जी. समुह रुग्णालय मुंबई चे अधिष्ठाता डाॅ. रणजीत माणकेश्वर यांच्या प्रमुख उपस्थितीत सेंट जॉर्जेस रुग्णालयात नव्याने स्थापित करण्यात आलेल्या अत्याधुनिक डिआर सिस्टम डिजिटल क्ष-किरण तपासणी यंत्र प्रणालीचा शुभारंभ पार पडला. सदर कार्यक्रम प्रसंगी सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे अधीक्षक डाॅ.आकाश खोब्रागडे सर, क्ष-किरण विभागाचे सर्व प्रमुख, अधिकारी, तंत्रज्ञ, कर्मचारी व इतर मान्यवर उपस्थित होते.