लोकार्पण सोहळा

ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज.जी.समूह रूग्णालये, मुंबई संलग्नीत सेंट जॉर्जेस रुग्णालय, मुंबई – 01.

राज्य शासन योजने अंतर्गत
“श्रेणीवर्धीत शवविच्छेदन संकुल” विकास कार्याचे लोकार्पण …
(दिनांक 09/06/2026)

मा.ॲड. राहूल नार्वेकर, अध्यक्ष, महाराष्ट्र विधान सभा यांच्या व मा. श्री हसन मुश्रीफ, मंत्री, वैद्यकीय शिक्षण, महाराष्ट्र राज्य, यांच्या सहकार्याने व पाठपुराव्याने राज्य शासन योजने अंतर्गत “श्रेणीवर्धीत शवविच्छेदन संकुल” विकास कार्याचे लोकार्पण आज दिनांक 09/06/2026 रोजी पार पडले.

हा लोकार्पण सोहळा मा. ॲड राहूल नार्वेकर, अध्यक्ष, विधान सभा यांच्या हस्ते व स्थानिक नगरसेविका हर्षिता नार्वेकर, नगरसेवक श्री मकरंद नार्वेकर, नगरसेविका डाॅ. गौरवी शिवलकर नार्वेकर, ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज.जी.समूह रूग्णालये, मुंबईचे अधिष्ठाता डाॅ. अजय भंडारवार सर, सेंट जॉर्जेस रुग्णालय मुंबई चे अधीक्षक डाॅ. विनायक सावर्डेकर सर यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या पार पडला.

अद्ययावत श्रेणीवर्धीत शवविच्छेदन संकुल हा बहुप्रतीक्षित सार्वजनिक कल्याणकारी प्रकल्प विधान सभा अध्यक्ष माननीय श्री राहूल नार्वेकर साहेब आणि माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री हसन मुश्रीफ साहेब यांच्या अमुल्य योगदानामुळे व सातत्यपूर्ण पाठपुराव्याने पुर्णत्वास येवू शकला आहे.

रूग्णांच्या नातेवाईकांचे दु:ख आणि मानवी प्रतिष्ठा ध्यानात घेवून सुरू करण्यात आलेल्या या सामाजिक सुविधा प्रकल्पाचे कार्य 2017 पासून सुरू होते. अनेक वर्षाची प्रतिक्षा, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि सर्वांच्या सामुहीक प्रयत्नाने अखेर या वास्तूच्या रूपाने सार्वजनिक आरोग्य सेवेमध्ये एक नवीन आणि संवेदनशील अध्याय सुरू झाला आहे. ही वास्तू केवळ एक इमारत नसून कठीण प्रसंगात नागरिकांना मिळणा-या संवेदनशील वैद्यकीय सेवेचे प्रतिक आहे.

हा प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेला प्रकल्प यशस्वी करण्यासाठी योगदान देणा-या सर्वांचे आम्ही आभार मानतो.

अधिष्ठाता डाॅ. अजय भंडारवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली सेंट जॉर्जेस रुग्णालय मुंबई चे अधीक्षक डाॅ. विनायक सावर्डेकर सर, प्रा. डाॅ. चिखलकर सर, निवासी वैद्यकीय अधिकारी – डाॅ. खालीद अन्सारी, डाॅ. गणेश भंडारी, डाॅ. हर्षवर्धन बनसोडे, डाॅ. योगेश राऊत, डाॅ. श्रध्दा अंधारे, डाॅ. जुही पवार, डाॅक्टर्स, नर्सेस, अधीसेवीका वैशाली माने मॅडम, प्रशासकीय अधिकारी श्री दिपक लाड, कार्यालयीन अधीक्षक – श्री नारायण गावडे व श्री निलेश परमार, श्री तुषार पवार (पर्चेस विभाग),
सार्वजनिक बांधकाम विभागातील इंजी.भूषण फेगडे कार्यकारी अभियंता, इंजी. रणजीत शिंगाडे – उपविभागीय अभियंता, इंजी. गोविंद सोनवणे – शाखा अभियंता, व सा.बां.वि. टीम, काँट्रॅक्टर- मन्सूर अली खत्री (ऐक्मे कंस्ट्रक्शन) व टीम, विद्युत विभागातील कार्यकारी अभियंता श्री. एस. एल. घोरपडे, उप-अभियंता श्री. मोहम्मद आकेफ, उपअभियंता श्री. ए. आर. द्विवेदी, सहाय्यक अभियंता श्रीमती रेखा एस.जाधव व टीम, सुरक्षा विभाग – सुरक्षा पर्यवेक्षीय अधिकारी श्री शहाजी शिरोळे, सुरक्षा पर्यवेक्षक श्री नितीन निचिते, सुरक्षा पर्यवेक्षक श्री रोहित पवार व सर्व सुरक्षा गार्डस, सर्व विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, सर्व समाज सेवी संस्था व सर्व सेवाभावी व्यक्ती, मुकादम – श्री विलास कदम, श्री मुकुंद काळे व टीम, स्मार्ट सर्विसचे श्री नितीन कांबळे व टीम, सर्व सफाई कर्मचारी, यांच्या अथक योगदानाने आजचा हा वैद्यकीय व सामाजिक संवेदनशीलता जोपासणारा लोकार्पण सोहळा यशस्वीरित्या पार पडला.

*(सेंट जॉर्जेस रुग्णालय, मुंबई च्या वतीने रूग्णालयाचे अधीक्षक डाॅ. विनायक सावर्डेकर सर यांनी या कार्यात आपले योगदान देवून सहकार्य केलेल्या सर्वांचेच आभार व्यक्त करून धन्यवाद दिले आहेत.)*

ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज.जी.समूह रूग्णालये, मुंबई संलग्नीत सेंट जॉर्जेस रुग्णालय, मुंबई-01.
(दिनांक : 09/06/2026)