दिनांक : 06/08/2026
सेंट जॉर्जेस रुग्णालय, मुंबई 01.
मा. श्री हसन मुश्रीफ साहेब, मंत्री वैद्यकीय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या विशेष उपस्थितीत व शुभहस्ते सेंट जॉर्जेस रुग्णालय मुंबई येथील राज्य शासन योजने अंतर्गत व जिल्हा नियोजन व विकास समिती अंतर्गत पूर्ण करण्यात आलेल्या विविध आरोग्य सेवा व सुविधा विषयक विकास कार्याचा “ई- उद्घाटन व लोकार्पण सोहळा” दि. 06/08/2026 रोजी शासकीय दंत महाविद्यालय, मुंबई येथील सभागृहात पार पडला. त्या सोहळ्यातील काही क्षणचित्रे.
मा. वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री हसन मुश्रीफ साहेब यांच्या विशेष उपस्थितीत व शुभहस्ते खालील विकास कार्याचे ई उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले.
- “स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभाग, वार्ड क्र.- 10
(जिल्हा नियोजन व विकास समिती अंतर्गत विकास कार्य) … - “हायपरबॅरिक ऑक्सिजन थेरपी सेंटर” …
(राज्य शासन योजने अंतर्गत विकास कार्य) -
“डायलिसिस विभाग”
(२४×७ डायलिसिस सेवेचा विस्तार) …
डायलिसिस सेवेचा दररोज 12 तासाचा कालावधी वाढवून दररोज 24 तास सेवा उपलब्ध.
(राज्य शासन योजनेअंतर्गत विकास कार्य) … - “कार्डियाक ॲम्ब्युलन्स सेवा” …
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) तर्फे रूग्ण सेवे करिता सेंट जॉर्जेस रुग्णालयास अत्याधुनिक रूग्ण वाहिका प्रदान …
इ. वैद्यकीय सेवा व सुविधांचा माननीय मंत्री महोदयाच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत ई लोकार्पण सोहळा पार पडला.
— सेंट जॉर्जेस रुग्णालय, मुंबई.
दिनांक : 06/08/2026.
