भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती NEW
आज दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी महामानव, बोधीसत्व, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती दिना निमित्ताने सेंट जाॅर्जेस रूग्णालय, मुंबई च्या वतीने मेन ओपीडी हाॅल येथे रूग्णालयाचे माननीय अधीक्षक डाॅ. विनायक सावर्डेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण व अभिवादन कार्यक्रम पार पडला. सदर प्रसंगी रूग्णालयातील कार्यरत निवासी वैद्यकीय अधिकारी, डाॅक्टर्स, अधीसेविका मॅडम, नर्सेस, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, सेंट जाॅर्जेस रूग्णालय कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
"सर्वांना भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा" ... 💐🙏
