“स्वस्थ नारी, सशक्त परिवार” अभियान …
सेंट जॉर्जेस रुग्णालय, मुंबई. ०१.
आज दिनांक ३०/०९/२०२५ रोजी सेंट जॉर्जेस रुग्णालय मुंबई येथे “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” या अभियाना अंतर्गत विविध आरोग्य विषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते.
सदरील कार्यक्रमाचे उद्घाटन डाॅ.अजय भंडारवार सर, अधिष्ठाता, ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज.जी.समूह रूग्णालये, मुंबई. यांचे हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले.
तसेच या कार्यक्रमास डाॅ. रणजीत माणकेश्वर, सहयोगी अधिष्ठाता, ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज.जी.समूह रूग्णालय, मुंबई. व
सर ज.जी. रूग्णालयाचे अधीक्षक डाॅ. संजय सुरासे यांची प्रमुख उपस्थिती लाभलेली होती.
सदर कार्यक्रम प्रसंगी सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे अधीक्षक डाॅ. विनायक सावर्डेकर सर, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, डाॅक्टर्स, निवासी वैद्यकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, अधिसेवीका, नर्सेस, कार्यालयीन अधीक्षक, सर्व कर्मचारी, सुरक्षा अधिकारी, कर्मचारी, सा.बां.वि.अधिकारी, कर्मचारी, समाजसेवी, विद्यार्थी व इतर मान्यवर उपस्थित होते.
!! स्वस्थ नारी, सशक्त परिवार !! …
सेंट जॉर्जेस रुग्णालय, मुंबई. ०१.
(दिनांक : ३०/०९/२०२५)
