“हरित महाराष्ट्र, समृध्द महाराष्ट्र” अभियान … सेंट जॉर्जेस रुग्णालय, मुंबई. ०१.
आज दिनांक ३०/०९/२०२५ रोजी सेंट जॉर्जेस रुग्णालय मुंबई येथे “हरित महाराष्ट्र, समृध्द महाराष्ट्र” या अभियाना अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.
या प्रसंगी श्री अनिल भंडारी, IAS, आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग, मुंबई. व श्री विवेक पाखमोडे, सहसंचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई. यांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
सदरील कार्यक्रम प्रसंगी डाॅ.अजय भंडारवार अधिष्ठाता, ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज.जी.समूह रूग्णालये मुंबई.
डाॅ. रणजीत माणकेश्वर, सहयोगी अधिष्ठाता, ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज.जी.समूह रूग्णालय मुंबई.
सर ज.जी. रूग्णालयाचे अधीक्षक डाॅ. संजय सुरासे,
सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे अधीक्षक डाॅ. विनायक सावर्डेकर सर यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली.
या अभियानात सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, डाॅक्टर्स, निवासी वैद्यकीय अधिकारी, अधिसेवीका, नर्सेस, प्रशासकीय अधिकारी, कार्यालयीन अधीक्षक, सर्व कर्मचारी, सुरक्षा अधिकारी, कर्मचारी, सा.बां.वि.अधिकारी, कर्मचारी, समाजसेवी, विद्यार्थी व इतर मान्यवर या सर्वांकडून प्रत्यक्ष सहभाग नोंदवून वृक्ष लागवड करण्यात आली.
!! हरित महाराष्ट्र, समृध्द महाराष्ट्र !! …
सेंट जॉर्जेस रुग्णालय, मुंबई. ०१.
(दिनांक : ३०/०९/२०२५)
