जगभरातील कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारी म्हणून केंद्र व राज्य शासनाच्या वतीने योग्य ती पावले उचलली जात आहेत. याचाच एक भाग म्हणून केंद्र व राज्य शासनाच्या कोविड-19 च्या नवीन मार्गदर्शक सुचनांनुसार वैद्यकीय यंत्रणा सुसज्ज व तत्पर राहावी यासाठी आज दिनांक 27/12/2022 रोजी सेंट जाॅर्जेस रूग्णालय मुंबई येथे “माॅकड्रिल” आयोजित करण्यात आलेले होते. सदर प्रसंगी रूग्णालयाचे अधीक्षक डाॅ. विनायक सावर्डेकर सर, अधीसेविका मॅडम, निवासी वैद्यकीय अधिकारी, डाॅक्टर्स, नर्सेस, तंत्रज्ञ, कर्मचारी, सफाई कर्मचारी, तसेच प्रिन्ट व इलेक्ट्राॅनिक मिडीयाचे प्रतिनिधी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
