“हिरकणी कक्ष” बेबी फिडींग सेंटर … उद्घाटन समारंभ …

सेंट जाॅर्जेस रूग्णालयाच्या मेन ओपीडी हाॅल येथे उभारण्यात आलेल्या “बेबी फिडींग सेंटर” चे आज दिनांक 09/12/2022 रोजी ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज.जी. समुह रूग्णालयाच्या अधिष्ठाता डाॅ. पल्लवी सापळे मॅडम यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. सेंट जाॅर्जेस रूग्णालयाचे अधिक्षक डाॅ. विनायक सावर्डेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली रूग्णालयातील समाज सेवा विभागाने ‘चाईल्ड हेल्थ फौण्डेशन’ व ‘आयडीबीआय ट्रस्टी’ यांच्या सहकारातून “बेबी फिडींग सेंटर” ही संकल्पना साकारलेली आहे. या स्वतंत्र कक्ष निर्मितीमुळे ओपीडी मध्ये आपल्या बाळासह येणा-या माता भगीनींना आपल्या बाळास निवांत स्तनपान करता येवू शकेल. या कक्ष निर्मितीच्या कार्यात ज्यांनी सहकार्य केले आहे त्या सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून कौतुक करण्यात आले.

अधिष्ठाता डाॅ. पल्लवी सापळे मॅडम व रूग्णालयाचे अधीक्षक डाॅ. विनायक सावर्डेकर सर यांनी या कार्याबद्दल संबंधीत सेवाभावी संस्था व विश्वस्तांचे आभार मानून अभिनंदन केले. सदरील कार्यक्रम प्रसंगी डाॅक्टर्स, नर्सेस, निवासी वैद्यकीय अधिकारी, अधिसेवीका मॅडम, प्रशासकीय अधिकारी, समाजसेवा अधीक्षक, समाज सेवी, विश्वस्त, स्वंयसेवी व इतर मान्यवर उपस्थित होते.