“रक्तदाता सन्मान समारंभ” … २०२१

१ आक्टोबर या राष्ट्रीय स्वेच्छा रक्तदान दिवसाचे औचित्य साधून दरवर्षी सेंट जॉर्जेस रुग्णालय मुंबई येथे रूग्णालयाच्या प्रादेशिक रक्तपेढीच्या माध्यमातून संपूर्ण महिनाभर रक्तदान विषयक विविध जनजागृतीपर कार्यक्रम व रक्तदान शिबीरांचं आयोजन केलं जातं. याचाच एक भाग म्हणून आज दि. २९/१०/२०२१ रोजी सेंट जॉर्जेस रुग्णालय प्रादेशिक रक्तदपेढी व राज्य रक्त संक्रमण परिषद (महाराष्ट्र राज्य) यांच्या संयुक्त विद्यमाने “रक्तदाता सन्मान समारोह” २०२१ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.

थॅलेसेमिया या सारख्या आजाराच्या रूग्णांसाठी व अन्य गंभीर आजाराच्या रूग्णांसाठी रक्ताची नेहमीच नितांत गरज भासत असते. सेंट जॉर्जेस रुग्णालय रक्तपेढी द्वारे रक्तदान शिबीरांच्या माध्यमातून रक्तसंकलन व रक्तपूरवठा हा योग्य प्रमाणात व योग्य पध्दतीने नियमितपणे केला जातो. यासाठी अनेक सामाजिक स्वंयसेवी संस्था व रक्तदाते हे स्व इच्छेने पूढे येवून रक्तदान करीत असतात. सेंट जॉर्जेस रुग्णालय रक्तपेढी साठी आजपर्यंत अनेक संस्थानी व व्यक्तींनी आपल्या स्व इच्छेनी रक्तदान करून मोलाचे योगदान दिलेले आहे. यापैकीच श्री राजेंद्र कुलकर्णी हे असे एक स्वैच्छिक रक्तदाते आहेत की त्यांनी आजपर्यंत १०३ वेळा सेंट जाॅर्जेस रूग्णालय रक्तपेढी साठी आपले रक्तदान करून एक मौलिक सामाजिक कामगीरी पार पाडून दाखवलेली आहे. ही रक्तदान कार्यातील खूपच प्रेरक अशी बाब आहे. त्यांच्या या कार्याबद्दल सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे अधीक्षक डाॅ.आकाश खोब्रागडे सर यांनी श्री राजेंद्र कुलकर्णी यांचा आदरयुक्त भावनेने सत्कार व कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले. याच बरोबर इतर नियमित स्वैच्छिक रक्तदाते व संस्थाचा देखील गौरवपूर्ण पध्दतीने सन्मान करून अधीक्षक डाॅ.आकाश खोब्रागडे सर यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे आभार मानले. यामध्ये प्रामुख्याने 1) नाॅवल डाॅक फोर्ट 2) चंद्रभागा जैन मंदिर 3) स्वर्णशिल्पी बंगाली संघ, काळबादेवी 4) संत निरंकारी मंडळ 5) नाना धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा, बदलापूर 6) संवेग फाऊंडेशन बदलापूर 7) डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था 8) शिवसेना शाखा वरळी 9) शिवसेना शाखा ,चंद्रपाड 10) लालबाग राजा सार्वजनिक गणेश मित्र मंडळ 11) शिवसेना शाखा गिरगांव 12) गणपती मंदिर सेंट जॉर्जेस रुग्णालय मुंबई 13) श्रीजी फूड्स 14) सिंधूदुर्ग को. ऑप. सोसायटी, देवीपाडा, बोरिवली 15) जागृती ग्रूप वरळी 16) शिवसेना शाखा मच्छीमार नगर कुलाबा 17) शिवसेना शाखा फोर्ट मुंबई 18)दत्त मंदिर गगनगीरी महाराज मलबार हील 19) लायन्स क्लब भिवंडी 20) डेंटल काॅलेज फोर्ट मुंबई 21) ओ.एन.जी.सी. द्रोणागिरी उरण 22) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर काॅलेज महाड 23) आर. एस. एस. ग्रूप भुलेश्वर 24) जनगर्जना प्रतिष्ठान, प्रतिक्षा नगर 25) Mrs. Roshini Lokare Inneerwheel club Dombivali 26) शिवसेना शाखा परेल 27) सेंट्रल रेल्वे मजदूर संघ 28) शिवसेना ठाणे (आ. एकनाथ शिंदे) 29) टिम वागड चॅरिटेबल ट्रस्ट अंधेरी 30) शिवसेना शाखा भायखळा

इत्यादी मान्यवर स्वैच्छिक रक्तदात्या संस्था व रक्तदाते यांचा सेंट जाॅर्जेस रूग्णालय रक्तपेढीच्या वतीने अधीक्षक डाॅ.आकाश खोब्रागडे सर यांच्या हस्ते यथोचित सन्मान करून सत्कार करण्यात आला.

सेंट जॉर्जेस रुग्णालय प्रादेशिक रक्तपेढीने राबविलेल्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल अधीक्षक डाॅ.आकाश खोब्रागडे सर यांनी रक्तपेढी विभागाच्या विभाग प्रमुख डाॅ. शाहिन कानपूरवाला मॅडम, रक्तसंक्रमण अधिकारी डाॅ. खालीद अन्सारी, वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक श्री प्रतापसिंह वळवी व सर्व रक्तपेढी तंत्रज्ञ व कर्मचारी यांचे अभिनंदन करून कौतूक केले.

याप्रसंगी अधीक्षक डाॅ.आकाश खोब्रागडे सर यांच्या सह अधिसेविका मॅडम, उपअधीक्षक डाॅ. संकेत गायधने, वैद्यकीय अधिकारी, डाॅक्टर्स, नर्सेस, रक्तपेढी स्टाफ, निमंत्रीत रक्तदाते पाहूणे व इतर मान्यवर उपस्थित होते.

– सेंट जॉर्जेस रुग्णालय, मुंबई-०१
दिनांक : २९/१०/२०२१