“कोविड-19 लसीकरण केंद्राचा उद्घाटन कार्यक्रम” …

आज दिनांक 24/09/2021 रोजी सेंट जॉर्जेस रुग्णालय मुंबई येथे कोविड-19 लसीकरण केंद्राचा उद्घाटन कार्यक्रम पार पडला.

कोरोना संसर्गाच्या संभावीत तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री श्री उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्र शासनाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम व कोरोना प्रतिबंधात्मक विविध उपाय योजना मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सेंट जॉर्जेस रुग्णालयात उभारण्यात आलेले हे “कोविड-19 लसीकरण केंद्र” होय.

राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. श्री अमितजी देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील लसीकरण केंद्राची निर्मिती साकारण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन महाराष्ट्र राज्याचे सचिव मा. श्री सौरभ विजय सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

सदरील लसीकरण केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी उद्घाटक म्हणून मा. श्री अरविंदजी सावंत साहेब (खासदार) व मा. श्रीमती संध्याताई सव्वालाखे मॅडम (अध्यक्षा, महाराष्ट्र काँग्रेस) यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. तसेच माजी नगरसेवक श्री गणेश सानप, श्री संजय गुरव (समाज सेवक), डाॅ. दिलीप म्हैसेकर साहेब (संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन महाराष्ट्र राज्य), डाॅ. अजय चंदनवाले सर (सहसंचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन महाराष्ट्र राज्य), अधिष्ठाता डाॅ. रणजीत माणकेश्वर सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे मा.अधीक्षक डाॅ.आकाश खोब्रागडे सर यांच्या हस्ते आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.

या प्रसंगी रूग्णालयाच्या अधिसेविका, अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी, डाॅक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय कर्मचारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

कोरोना रुग्णांना रूग्णसेवा देण्या बरोबरच आता सेंट जॉर्जेस रुग्णालयात कोरोना लसीकरण केंद्राची निर्मिती करण्यात आल्यामुळे सर्व सामान्य जनतेला याचा भरपूर लाभ होणार आहे” असे मत रूग्णालयाचे अधीक्षक डाॅ.आकाश खोब्रागडे सर यांनी व्यक्त केले आहे.

– सेंट जाॅर्जेस रूग्णालय, मुंबई. 400001.
दिनांक : 24/09/2021.