मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ मा.मुख्यमंत्री श्री उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या हस्ते दि. 8 जुलै 2021रोजी ऑनलाईन पध्दतीने पार पडला आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमा अंतर्गत सेंट जॉर्जेस रुग्णालय मुंबई येथे कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर हेल्थकेअर, नर्सिंग, पॅरामेडीकल क्षेत्राशी संबंधीत अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र शासनाकडून राबविण्यात येत असलेला हा प्रशिक्षण कार्यक्रम येणार्या कालखंडात वैद्यकीय क्षेत्रातील प्रशिक्षीत मनुष्यबळ क्षमतेच्या दृष्टीने व अर्थातच वैद्यकीय क्षेत्रातील रोजगाराच्या दृष्टीने देखील अत्यंत उपयुक्त असा ठरणारा असेल.
