“ह्दयरोग रूग्ण वाहिकेचे लोकार्पण” …

आज दिनांक 23 जून 2021 रोजी सेंट जॉर्जेस रुग्णालय मुंबई येथे GIA India, Gem & Jewellery National Relief Foundation (GJNRF) च्या वतीने अत्याधुनिक पध्दतीची “ह्दयरोग रुग्ण वाहिका” सेंट जॉर्जेस रुग्णालयास देणगी रूपात दान करण्यात आली. सदर रूग्ण वाहिकेचे हस्तांतरण वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग महाराष्ट्र राज्याचे संचालक मा. पद्मश्री डाॅ.तात्याराव लहाने सर, श्री श्रीराम नटराजन – Managing Director Of GIA India., श्री संजय कोठारी – Chairman Of Gem & Jewellery National Relief Foundation (GJNRF) यांच्या हस्ते व रुग्णालयाचे अधीक्षक डाॅ.आकाश खोब्रागडे सर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

ही रूग्ण वाहिका ह्दयरोग रुग्णाच्या वैद्यकीय सेवेच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त ठरणारी आहे.

GIA India, Gem & Jewellery National Relief Foundation च्या वतीने सामाजिक जाणिवेतून रूग्णालयास प्रदान करण्यात आलेल्या या रूग्ण सेवेबद्दल रूग्णालयाचे अधीक्षक डाॅ.आकाश खोब्रागडे सर यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहे.

– सेंट जाॅर्जेस रूग्णालय, मुंबई. 400 001.