केंद्र शासनाच्या “स्वच्छ भारत अभियान” या कार्यक्रमाअंतर्गत व महाराष्ट्र राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार आज दिनांक ०१ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १०:०० वाजता सेंट जाॅर्जेस रूग्णालय मुंबई येथे “स्वच्छता अभियान” राबविण्यात आले.

सेंट जाॅर्जेस रूग्णालयाचे अधीक्षक डाॅ. विनायक सावर्डेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली रूग्णालयातील सर्व अधिकारी, वर्ग ३ व ४ चे सर्व कर्मचारी, निवासी वैद्यकीय अधिकारी, अधिसेविका मॅडम, डाॅक्टर्स, नर्सेस, सुरक्षा रक्षक, विद्यार्थी या सर्वांनी या स्वच्छता अभियानात आपला उत्स्फुर्त सहभाग नोंदवून श्रमदान दिले.

सेंट जाॅर्जेस रूग्णालय, मुंबई, ०१
दि. ०१ ऑक्टोबर २०२३