सेंट जाॅर्जेस रूग्णालयाचे मा.अधीक्षक डाॅ. विनायक सावर्डेकर सर यांच्या हस्ते राष्ट्र ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले

💐🇮🇳💐

75 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सेंट जाॅर्जेस रूग्णालय, मुंबई येथे आज दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी सकाळी ठिक 08:00am वाजता सेंट जाॅर्जेस रूग्णालयाचे मा.अधीक्षक डाॅ. विनायक सावर्डेकर सर यांच्या हस्ते राष्ट्र ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले व राष्ट्र गीत गाऊन ध्वजास मानवंदना देण्यात आली.

ध्वजारोहण कार्यक्रमानंतर मागील वर्षभरात उत्कृष्ट रूग्णालयीन सेवा देणारे व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले डाॅक्टर्स, नर्सेस, तंत्रज्ञ, कर्मचारी, समाजसेवी व विद्यार्थी यांना अधीक्षक साहेबांच्या हस्ते सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले.

प्रजासत्ताक दिनाच्या या कार्यक्रम प्रसंगी रूग्णालयातील कार्यरत सर्व डाॅक्टर्स, निवासी वैद्यकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, कार्यालयीन अधीक्षक, अधीसेविका, गट-अ , गट-ब अधिकारी, प्राध्यापक वृंद, नर्सेस, वर्ग-3 व वर्ग-4 चे कर्मचारी, समाजसेवी, रूग्णालयाचे सुरक्षा प्रमुख, सुरक्षाकर्मी, विद्यार्थी व इतर निमंत्रित मान्यवर उपस्थित होते.

“75 व्या प्रजासत्ताक दिना निमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा” … !
“जय हिंद” … 💐🇮🇳💐

– सेंट जाॅर्जेस रूग्णालय, फोर्ट, मुंबई – 400 001.