!! हार्दिक अभिनंदन !! माझी वसुंधरा- 2022 या अभियानांतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिके तर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत शासकीय रूगणालये या श्रेणीमध्ये सेंट जाॅर्जेस रूग्णालय मुंबई यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे.


!! हार्दिक अभिनंदन !! “माझी वसुंधरा”- 2022 या अभियानांतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिके तर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत शासकीय रूगणालये या श्रेणीमध्ये सेंट जाॅर्जेस रूग्णालय मुंबई यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे. त्याबद्दल सेंट जाॅर्जेस रूग्णालय मुंबईचे हार्दिक अभिनंदन. सदर स्पर्धा ही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने व महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेली होती. “माझी वसुंधरा” या संकल्पनेत पर्यावरणपूरक पध्दतीने इमारतींचे संवर्धन, स्वच्छता, उद्यान, वृक्ष संवर्धन, कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक प्रतिबंधात्मक उपाययोजना व याचबरोबर या सर्व पर्यावरणपूरक बाबींची जनजागृती व्हावी या उद्देशाने राबविण्यात येणारे विविध कार्यक्रम व उपक्रम इत्यादी बाबींचा यात समावेश होता.

सेंट जाॅर्जेस रूग्णालयाची इमारत ही मुंबईच्या फोर्ट परिसरात वसलेली व जागतिक वारसा प्राप्त असलेली एक ऐतिहासीक इमारत आहे. अशा या रूग्णालयीन इमारतीचे व परिसराचे पर्यावरणपूरक असे संवंर्धन, साफ सफाई, उद्यान, वृक्षसंर्वर्धन, कचरा व्यवस्थापन, रूग्णालयीन स्तरांवरील पर्यावरणपूरक जनजागृती इत्यादी बाबतीत सेंट जाॅर्जेस रूग्णालयाचे प्रशासन व येथील सर्व स्टाफ अथक परिश्रम घेत असतो.

“माझी वसुंधरा” हे मिळालेले पारितोषिक रूगालयाने केलेल्या कामांची जणू पावतीच होय.

रूग्णालयाने मिळवलेल्या या यशाबद्दल रूग्णालयाचे अधीक्षक डाॅ. विनायक सावर्डेकर सर यांनी रूग्णालयाच्या संपूर्ण स्टाफचे हार्दिक अभिनंदन करून कौतूक केले आहे व येणा-या काळातही रूग्णालयाचा लौकिक असाच वृध्दींगत होत राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

– सेंट जाॅर्जेस रूग्णालय, मुंबई.01.