भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 75 व्या वर्धापन दिना निमित्ताने सेंट जाॅर्जेस रूग्णालय, मुंबई येथे दि.15-ऑगस्ट-2021 रोजी सकाळी ठिक 08:00am वाजता सेंट जाॅर्जेस रूग्णालयाचे मा.अधीक्षक डाॅ.आकाश खोब्रागडे सर यांच्या हस्ते राष्ट्र ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले व राष्ट्र गीत गाऊन ध्वजास मानवंदना देण्यात आली.
15 ऑगस्ट ‘स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ‘कोविड-19’ या जागतिक संसर्गजन्य आजाराच्या महाभयानक व आव्हानात्मक कालावधीत ‘कोविड योध्दा’ म्हणून उल्लेखनीय योगदान दिलेल्या व्यक्तींचा, संस्थांचा सन्मान म्हणून त्यांना प्रशस्तिपत्र देवून सन्मानित करण्यात आले.
सदर प्रसंगी रूग्णालयातील कार्यरत सर्व डाॅक्टर्स, नर्सेस, अधीसेविका मॅडम, निवासी वैद्यकीय अधिकारी, गट-अ , गट-ब सर्व अधिकारी, प्राध्यापक वृंद, सर्व तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचारी, रूग्णालयाचे सुरक्षा प्रमुख व सर्व सुरक्षाकर्मी, विद्यार्थी, निमंत्रीत अतिथी गण व इतर मान्यवर उपस्थित होते.
“भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 75 व्या वर्धापन दिना निमित्ताने सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा” … !
“जय हिंद” …
– सेंट जाॅर्जेस रूग्णालय, मुंबई – 400 001.