“स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” … 💐🇮🇳💐
भारतीय स्वातंत्र्य दिना निमित्ताने सेंट जाॅर्जेस रूग्णालय, मुंबई येथे आज दि.15-ऑगस्ट-2022 रोजी सकाळी ठिक 08:00am वाजता सेंट जाॅर्जेस रूग्णालयाचे मा.अधीक्षक डाॅ.आकाश खोब्रागडे सर यांच्या हस्ते राष्ट्र ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले व सामुहीक राष्ट्र गीत गाऊन ध्वजास मानवंदना देण्यात आली.
सदर प्रसंगी रूग्णालयातील कार्यरत सर्व डाॅक्टर्स, निवासी वैद्यकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, अधीसेविका मॅडम, नर्सेस, गट-अ , गट-ब सर्व अधिकारी, प्राध्यापक वृंद, तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचारी वर्ग, रूग्णालयाचे सुरक्षा प्रमुख, सुरक्षाकर्मी, विद्यार्थी, निमंत्रीत अतिथी गण व इतर मान्यवर उपस्थित होते.
“भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा” … !
आज दिनांक 15 ऑगस्ट 2022 भारतीय स्वातंत्र्य दिना निमित्ताने सेंट जाॅर्जेस रूग्णालय मुंबई येथे ध्वजारोहण कार्यक्रम पार पडल्यानंतर रूग्णालयाचे माननीय अधीक्षक डाॅ.आकाश खोब्रागडे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत MSF जवाना कडून मार्चपास्ट, तसेच रूग्णालयातील डाॅक्टर्स, परिचारिका, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी यांची स्वातंत्र्य अमृत महोत्सवी रॅली, परिचारिका व विद्यार्थ्यांकडून शहीदांना समर्पित पथनाट्य, देशभक्तीपर गीते, जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन प्रात्यक्षिक, पाणी बचत, स्वच्छता जनजागृती इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते. प्रसंगी सर्व डाॅक्टर्स, नर्सेस, अधिसेविका, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व इतर मान्यवर उपस्थित होते.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त देशभर सर्वत्र विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त राज्यातही “स्वराज्य महोत्सव” या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून आज दिनांक 17 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी ठिक 11:00am वाजता राज्यात सर्वत्र “सामुहीक राष्ट्रगीत गायन” हा उपक्रम राबविण्यात आलेला होता.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त देशभर सर्वत्र विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त राज्यातही “स्वराज्य महोत्सव” या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून आज दिनांक 17 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी ठिक 11:00am वाजता राज्यात सर्वत्र “सामुहीक राष्ट्रगीत गायन” हा उपक्रम राबविण्यात आलेला होता.
या उपक्रमात सेंट जाॅर्जेस रूग्णालयाने देखील उल्हासपूर्वक आपला सहभाग नोंदवून आज दिनांक 17 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी ठिक 11:00 am वाजता “सामुहीक राष्ट्रगीत” गायनाचा हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडलेला आहे.
या प्रसंगी रूग्णालयाचे सन्मानीय अधीक्षक डाॅ.आकाश खोब्रागडे सर, सर्व डाॅक्टर्स, नर्सेस, निवासी वैद्यकीय अधिकारी, अधिसेवीका मॅडम, प्रशासकीय अधिकारी, कार्यालयीन अधीक्षक, सर्व कर्मचारी, विद्यार्थी, सुरक्षा रक्षक व इतर मान्यवर उपस्थित होते.
“जय हिंद” … 🇮🇳
- भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या सुचनांनुसार दिनांक 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत देशात सर्वत्र “हर घर तिरंगा” अर्थात “घरोघरी तिरंगा” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या या उपक्रमांतर्गत सेंट जॉर्जेस रुग्णालय मुंबई व शासकीय नर्सिंग महाविद्यालय, सेंट जॉर्जेस रुग्णालय परिसर मुंबई येथे आज दिनांक 13 ऑगस्ट 2022 रोजी सन्मान पूर्वक भारतीय तिरंगा ध्वज फडकविण्यात आला.
- भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर सेंट जॉर्जेस रुग्णालयाच्या मुख्य इमारतीवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे.