स्वच्छ मुख अभियान

वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने “स्वच्छ मुख अभियान” राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने दिनांक 15/02/2023 रोजी सेंट जाॅर्जेस रूग्णालय मुंबई येथे नर्सिंग विद्यार्थी व स्टाफ नर्सेस यांच्यासाठी ‘दंत चिकित्सा व दंत आरोग्य’ विषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डाॅ. विवेक पाखमोडे सर सहसंचालक (दंत) वैद्यकीय शिक्षण व संशोधन महाराष्ट्र राज्य यांची प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन लाभले. तसेच दंत वैद्यकीय क्षेत्रातील इतर मान्यवरांचे देखील यावेळी मार्गदर्शन लाभले. रुग्णालयाचे अधीक्षक डाॅ. विनायक सावर्डेकर सर व अधिसेविका मॅडम यांच्या विशेष आयोजनाने व सहयोगाने कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली. प्रसंगी नर्सिंग विद्यार्थी, विद्यार्थिनी, स्टाफ नर्सेस, डाॅक्टर्स, अधिसेविका मॅडम, अन्य तज्ञ मंडळी व इतर मान्यवर उपस्थित होते.