“मुख्यमंत्री महा आरोग्य कौशल्य विकास कार्यक्रम” अंतर्गत सेंट जाॅर्जेस रूग्णालयात कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर हेल्थकेअर, नर्सिंग, पॅरामेडीकल क्षेत्राशी संबंधीत प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आलेले आहेत. या प्रशिक्षण वर्गातील सहभागी प्रशिक्षणार्थ्यांनी आज स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत रूग्णालय परिसरातील उद्यानात स्वेच्छा पध्दतीने स्वच्छता मोहीम राबवून परिसर व उद्यान स्वच्छ केले आहे. त्या सर्वांचे अभिनंदन.