“मानसिक आरोग्य सप्ताह” २०२१
सेंट जॉर्जेस रुग्णालय, मुंबई.
दिनांक १०/१०/२०२१ या जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून पूढे सात दिवस सेंट जॉर्जेस रुग्णालय, मुंबई येथे “मानसिक आरोग्य सप्ताह- २०२१” चे आयोजन करण्यात आलेले आहे.
कोरोना या जागतिक संसर्गजन्य आजाराच्या महाभयानक काळात सध्याचे सामाजिक, मानसिक संतुलन अधिक तिव्रतेने बिघडत चालले आहे, या बाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने रूग्णालयाचे अधीक्षक डाॅ.आकाश खोब्रागडे सर व रुग्णालयाच्या अधीसेविका श्रीमती अर्चना बडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली “मानसिक आरोग्य सप्ताह” च्या माध्यमातून सध्य परिस्थितीत मानसिक आरोग्य कसे राखता येईल या बाबत मेन ओपिडी येथे विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये पोस्टर्स प्रदर्शनी, रांगोळी प्रदर्शनी, पथनाट्य इत्यादींचा सामावेश आहे.
कोरोना काळात मानसिक आरोग्य कसे राखले जावे या जनजागृतीपर उपक्रमास रूग्णालयाचे अधीक्षक डाॅ.आकाश खोब्रागडे सर यांनी प्रत्यक्ष भेट देवून या जनजागृतीपर उपक्रमाचे व हा उपक्रम प्रत्यक्षात राबविणा-या स्टाफ नर्सेसचे व विद्यार्थ्यांचे कौतूक करून अभिनंदन केले आहे.
– सेंट जॉर्जेस रुग्णालय, मुंबई. ०१.
दिनांक : १४/१०/२०२१