वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनाच्या पार्श्वभूमीवर म्हणजेच आज दिनांक 19/02/2023 रोजी पासून संपूर्ण राज्यभर “महारक्तदान अभियान” राबविण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून आज दिनांक 19/02/2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून सेंट जाॅर्जेस रूग्णालय मुंबई येथे “रक्तदान शिबीराचा” शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. याप्रसंगी डाॅ. विवेक पाखमोडे सर सहसंचालक, (दंत) वैद्यकीय शिक्षण व संशोधन, महाराष्ट्र राज्य, मुंबई., डाॅ. डिंपल मॅडम, अधिष्ठाता, शासकीय दंत वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई यांची प्रमुख उपस्थिती लाभलेली होती. सदर कार्यक्रम प्रसंगी अधीक्षक डाॅ. विनायक सावर्डेकर सर, रक्तपेढी विभागप्रमुख डाॅ.शाईन कानपूरवाला मॅडम, निवासी वैद्यकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, डाॅक्टर्स, अधिसेविका मॅडम, नर्सेस, रक्तपेढी अधिकारी, तंत्रज्ञ, कर्मचारी व रक्तदाता मान्यवर उपस्धित होते. यावेळी रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देवून त्यांचा गौरव करण्यात आला.