महामहिम राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारी यांच्या द्वारा सर जे. जे. ग्रुप ऑफ हाॅस्पिटल च्या कोविड योद्ध्यांचा सन्मान

आज दिनांक 30/09/2020 रोजी राजभवन येथे महामहिम राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांच्या वतीने कोविड-19 च्या लढ्यात उल्लेखनीय व प्रशंसनीय कामगिरी करणारे सर जे.जे. ग्रुप ऑफ हाॅस्पिटल्स मधील कार्यरत कोविड योद्धे यांना निमंत्रित करण्यात आलेले होते. महामहिम राज्यपाल यांनी स्वतः या सर्व निमंत्रित कोविड योद्ध्यांचा यथोचित सन्मान ठरून कौतुक केले. सदर कार्यक्रम प्रसंगी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, मुंबई चे संंचालक पद्ममश्री डाॅ. तात्याराव लहाने सर, सर ज.जी. समुह रूग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. मानकेश्वर, सर ज.जी. समुह रूग्णालयाशी संलग्नीत सर्व रूग्णालयांचे अधीक्षक, अधीसेविका, डाॅक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय सेवा क्षेत्रातील कार्यरत कोविड योद्धे व इतर निमंत्रित मान्यवर उपस्थित होते. आभार प्रदर्शन सेंट जाॅर्जेस रूग्णालयाचे अधीक्षक डाॅ. आकाश खोब्रागडे यांनी व्यक्त केले.