महापरिनिर्वाण दिन

“महापरिनिर्वाण दिन”
अभिवादन कार्यक्रम … 🌹🙏

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न, बोधिसत्व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्ताने आज दिनांक 06 डिसेंबर 2024 रोजी सेंट जॉर्जेस रुग्णालय मुंबई येथे रूग्णालयाचे माननीय अधीक्षक डाॅ. विनायक सावर्डेकर सर यांच्या हस्ते रूग्णालयाच्या वतीने भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, डाॅक्टर्स, नर्सेस, कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी, विद्यार्थी, सेंट जॉर्जेस रुग्णालय कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
“महामानव भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस कोटी कोटी वंदन” … 🌸🙏
– सेंट जॉर्जेस रुग्णालय, मुंबई-01.