भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 74 व्या वर्धापन दिना निमित्ताने सेंट जाॅर्जेस रूग्णालय, मुंबई येथे दि.15-ऑगस्ट-2020 रोजी सकाळी ठिक 08:00am वाजता सेंट जाॅर्जेस रूग्णालयाचे मा.अधीक्षक डाॅ.आकाश खोब्रागडे यांच्या हस्ते राष्ट्र ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले व राष्ट्र गीत गाऊन ध्वजास मानवंदना देण्यात आली. सदर प्रसंगी रूग्णालयातील कार्यरत सर्व डाॅक्टर्स, नर्सेस, अधीसेविका मॅडम, निवासी वैद्यकीय अधिकारी, गट-अ , गट-ब सर्व अधिकारी, प्राध्यापक वृंद, सर्व तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचारी, रूग्णालयाचे सुरक्षा प्रमुख व सर्व सुरक्षाकर्मी, विद्यार्थी व इतर मान्यवर उपस्थित होते.
कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने निर्धारित करून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत स्वातंत्र्य दिना निमित्तचा हा ध्वजारोहण सोहळा व्यवस्थितरित्या पार पडला.
आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने रूग्णालयातील कोविड पाॅजिटिव्ह रूग्णांसाठी रूग्णालयाच्या वतीने जेवणासाठी विशेष मेनू बनवण्यात आलेला होता. या मेनू साठी रूग्णालयातील आहार विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेऊन रूग्णांसाठी अतिशय रूचकर असे पदार्थ बनवले. त्या बद्दल आहार विभागातील कर्मचाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन.
“भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 74 व्या वर्धापन दिना निमित्ताने सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा” … !
“जय हिंद” …
– सेंट जाॅर्जेस रूग्णालय, मुंबई – 400 001.