दिनविशेष : ‘जागतिक महिला दिवस’

आज दिनांक : ०८/०३/२०२२ रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सेंट जाॅर्जेस रूग्णालय, मुंबई येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते.

यामध्ये कर्करोग मोफत तपासणी शिबीर, पोस्टर मेकींग, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, पथनाट्य, निर्भया पोलीस पथकामार्फत मार्गदर्शन शिबीर, आर्थिक नियोजन शिबीर, फॅन्सी ड्रेस स्पर्धा इत्यादी कार्यक्रमांचा सामावेश होता.

सदरील कार्यक्रमांची सुरूवात रूग्णालयाचे माननीय अधीक्षक डाॅ.आकाश खोब्रागडे सर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले. याप्रसंगी रूग्णालयाच्या अधीसेविका श्रीमती अर्चना बडे मॅडम, श्रीमती अंजूला लाजरस अध्यक्ष, TNAI मुंबई सिटी ब्रँच, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या, निवासी वैद्यकीय अधिकारी, डाॅक्टर्स, नर्सेस, महिला अधिकारी, कर्मचारी, व निमंत्रीत पाहूणे उपस्थित होते.

“जागतिक महिला दिना निमित्ताने सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा” …. 💐
– सेंट जॉर्जेस रुग्णालय, मुंबई.
दिनांक : ०८/०३/२०२२