जागतिक योग दिवस 2024

दिनांक : 21 जून 2024
दिन विशेष : “जागतिक योग दिवस”

आज दिनांक 21जून 2024 रोजी सकाळी 7:30am. ते 8:30am. दरम्यान जागतिक योग दिनाचे औचित्य साधत सेंट जाॅर्जेस रूग्णालय मुंबई येथे रूग्णालयाचे माननीय अधीक्षक डाॅ. विनायक सावर्डेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली “योग प्रशिक्षण” शिबीराचे आयोजन करण्यात आलेले होते.

या योग शिबीरासाठी योग प्रशिक्षक म्हणून डाॅ. अमोल हुले यांची प्रमुख उपस्थिती लाभलेली होती. यावेळी डाॅ.अमोल हुले यांनी उपस्थितांना अतिशय प्रभावी पध्दतीने योग मार्गदर्शन व योग प्रात्यक्षिकं करून योगाभ्यासाचे महत्व पटवून सांगितले.

याप्रसंगी रूग्णालयाचे अधीक्षक, निवासी वैद्यकीय अधीकारी, डाॅक्टर्स, नर्सेस, कर्मचारी, विद्यार्थी, सुरक्षा कर्मचारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी अधीक्षक डाॅ. विनायक सावर्डेकर सर यांच्या हस्ते योग प्रशिक्षक डाॅ. अमोल हुले यांना शाल, श्रीफळ व पुष्पगूच्छ देवून सन्मानित करण्यात आले.

सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
“जागतिक योग दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा” … 💐👍