जागतिक मधुमेह दिवस व बाल दिन

दिनविशेष: “जागतिक मधुमेह दिवस” व “बाल दिन”, सेंट जाॅर्जेस रूग्णालय, मुंबई.

आज दिनांक 14 नोव्हेंबर 2022 रोजी जागतिक मधुमेह दिवस व बाल दिनाचे औचित्य साधत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. यामध्ये जागतिक मधुमेह दिना निमित्ताने मधुमेह आजाराची कारणे, लक्षणे व उपाय याविषयी सामाजिक जन जागृती व्हावी या उद्देशाने तज्ञ डाॅक्टरांचे मार्गदर्शन, पोस्टर प्रदर्शनी, रांगोळी स्पर्धा, पथनाट्य तसेच बालदिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी कार्यक्रमांचा सामावेश होता.

सदरिल कार्यक्रमास रूग्णालयाचे अधीक्षक साहेब डाॅ.विनायक सावर्डेकर सर यांची प्रमुख उपस्थिती लाभलेली होती. तज्ञांच्या मार्गदर्शनपर भाषणा नंतर या जनजागृतीपर उपक्रमात आपला उल्लेखनीय सहभाग नोंदवल्यबद्दल अधीक्षक साहेबां कडून विजेत्याचे, सहभागी स्पर्धकांचे कौतुक करण्यात आले व पारितोषीक देवून सन्मान करण्यात आला. या प्रसंगी उपअधीक्षक डाॅ.अनंत शिणगारे सर, डाॅ.कटके मॅडम (स्त्रीरोग तज्ञ), डाॅ.सुजाता चहांदे मॅडम (नेत्ररोग तज्ञ), डाॅ.भैसारे सर, अधिसेविका श्रीमती अर्चना बढे मॅडम, सर्व निवासी वैद्यकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, कार्यालयीन अधीक्षक, समाजसेवा अधीक्षक, नर्सेस, कर्मचारी, विद्यार्थी, मधुमेहीरूग्ण, रुग्ण नातेवाईक व इतर मान्यवर उपस्थित होते.

– सेंट जाॅर्जेस रूग्णालय, मुंबई. – 01.
दिनांक : 14 नोव्हेंबर 2022.