आज दिनांक 19 फेब्रूवारी 2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिना निमित्ताने सेंट जाॅर्जेस रूग्णालय मुंबई च्या वतीने मेन ओपीडी हाॅल येथे रूग्णालयाचे माननीय अधीक्षक डाॅ. विनायक सावर्डेकर सर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून व महाराष्ट्र राज्यगीत गाऊन वंदन करण्यात आले. सदर प्रसंगी रूग्णालयातील कार्यरत वैद्यकीय अधिकारी, डाॅक्टर्स, प्रशासकीय अधिकारी, अधीसेविका मॅडम, नर्सेस, कर्मचारी, विद्यार्थी, सेंट जाॅर्जेस रूग्णालय कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, कर्मचारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
आज दिनांक 19 फेब्रूवारी 2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिना निमित्ताने अधीक्षक कार्यालय, सेंट जाॅर्जेस रूग्णालय मुंबई येथे रूग्णालयाचे माननीय अधीक्षक डाॅ. विनायक सावर्डेकर सर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून वंदन करण्यात आले. सदर प्रसंगी रूग्णालयातील कार्यरत वैद्यकीय अधिकारी, डाॅक्टर्स, प्रशासकीय अधिकारी, अधीसेविका मॅडम, कार्यालयीन कर्मचारी व इतर मान्यवर उपस्थित होते.