आंतरराष्ट्रीय योग दिवस

आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून सेंट जाॅर्जेस रूग्णालय मुंबई येथे आज दिनांक 21 जून 2023 रोजी सकाळी 7:30 ते 8:30 च्या दरम्यान योग शिबीराचे आयोजन करण्यात आलेले होते.

सदर योग शिबीरात रूग्णालयाचे अधिक्षक डाॅ. विनायक सावर्डेकर सर यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, निवासी वैद्यकीय अधिकारी, अधिकारी, प्राध्यापक, डाॅक्टर्स, अधिसेविका, नर्सेस, कर्मचारी, सुरक्षा रक्षक, विद्यार्थी यां सर्वांनी आपला सहभाग नोंदवून हा योग शिबीराचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. या प्रसंगी योग मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या सर्व योगा टिचर्सचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

“आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा”