“स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” … 💐🇮🇳💐 अंतर्गत …
“स्कूल हेल्थ प्रोग्राम” …
भारतीय स्वातंत्र्य महोत्सवी वर्षा निमित्ताने सेंट जाॅर्जेस रूग्णालय मुंबई च्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते आणि करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून दिनांक 18 ऑगस्ट 2022 रोजी सेंट जॉर्जेस रुग्णालयाच्या वतीने बोरीबंदर येथील बृहन्मुंबई महानगर पालीका शाळेतील इयत्ता 1 ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी “स्कूल हेल्थ प्रोग्राम” चे आयोजन करण्यात आलेले होते. यामध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य विषयक चाचणी, तपासणी, आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता, व्यायाम, खेळ व संतुलीत आहार यांच्या माध्यमातून आपली आरोग्यदायक व निरोगी जीवनशैली कशी राखली जाते या बाबतचे मार्गदर्शन इत्यादी कार्यक्रमांचा त्यात सामावेश होता. या हेल्थ प्रोग्राम मध्ये विद्यार्थ्यांनी आपला उत्स्फुर्त सहभाग नोंदवून लाभ घेतला.

सदरील कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी रूग्णालयाचे अधीक्षक डाॅ.आकाश खोब्रागडे सर, अधिसेविका श्रीमती अर्चना बढे मॅडम, डाॅक्टर्स, नर्सेस, ब्रदर्स व शाळा प्रशासन इत्यादिंचे मोलाचे सहकार्य लाभले.

– सेंट जॉर्जेस रुग्णालय, मुंबई. 01.