सेंट जाॅर्जेस रूग्णालय, मुंबई. ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज.जी. समुह रूग्णालये, मुंबई संचलीत …
“श्रेणी वर्धीत शस्त्रक्रियागृहाचे लोकार्पण” सोहळा व “रक्तशुध्दीकरण केंद्राचे उद्घाटन” सोहळा मान्यवरांच्या उपस्थित संपन्न …
दिनांक 12 जुलै 2023 रोजी सकाळी 11:00 वाजता मा.ना. श्री गिरीष महाजन साहेब, मंत्री, वैद्यकीय शिक्षण, ग्रामविकास, क्रिडा व युवक कल्याण, महाराष्ट्र राज्य., व
मा.ना. ॲड. राहूल नार्वेकर साहेब, अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा यांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभहस्ते सेंट जाॅर्जेस रूग्णालय मुंबई येथे “श्रेणी वर्धीत शस्त्रक्रियागृहाचे लोकार्पण” सोहळा व “रक्तशुध्दीकरण केंद्राचे उद्घाटन” सोहळा पार पडला.
लोकार्पण व उदघाटन सोहळा पार पडल्यानंतर मा. मंत्री महोदय व मा. विधानसभा अध्यक्ष यांच्या कडून श्रेणी वर्धीत शस्त्रक्रियागृह व डायलिसीस सेंटरची संपूर्ण पाहणी करण्यात आली. आगामी कालावधीत याबाबत लागणारे आवश्यक तितके मनुष्यबळ व आवश्यक तिथे अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याबाबत शासन म्हणून आम्ही प्रयत्नशील व आग्रही राहू असे त्यांनी आश्वासन दिले. व या माध्यमातून रूग्णांची सेवा चांगल्या पध्दतीने सुरू राहावी यासाठी शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रम प्रसंगी मा.डाॅ. अश्विनी जोशी मॅडम, सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्य विभाग, मंत्रालय, मुंबई., मा. श्री राजीव निवतकर साहेब, आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई., मा. डाॅ. दिलीप म्हैसेकर सर, संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई., मा. डाॅ. अजय चंदनवाले सर, सहसंचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई., मा. डाॅ. विवेक पाखमोडे सर, सहसंचालक (दंत) वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई., मा. डाॅ. पल्लवी सापळे मॅडम, अधिष्ठाता, सर ज.जी. समुह रूग्णालये व ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई. या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभलेली होती.
सर ज. जी. समुह रूग्णालयाशी संलग्नीत सर्व रूग्णालयाचे अधीक्षक, रूग्णालयातील सर्व विभाग प्रमुख, अधिकारी, डाॅक्टर्स, निवासी वैद्यकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, कार्यालयीन अधीक्षक, अधीसेवीका, नर्सेस, कर्मचारी, विद्यार्थी, समाजसेवी, सा.बां.वि.अधिकारी, कर्मचारी, रुग्णालयीन सुरक्षा प्रमुख, सुरक्षा कर्मचारी, सफाई कर्मचारी, मिडीया कर्मी व इतर मान्यवर या कार्यक्रमासाठी हजर होते.
शासकीय रूग्णालयातील वैद्यकीय सुविधेच्या उपलब्धतेने गोर गरीब रूग्णांची आर्थिक समस्या सावरली जावू शकते आणि अशीच वैद्यकीय सुविधा श्रेणीवर्धीत शस्त्रक्रियागृह व डायलिसीस सेंटरच्या माध्यमांतून शासनाने या रूग्णालयास उपलब्ध करून दिल्याबद्दल रूगालयाचे अधीक्षक डाॅ. विनायक सावर्डेकर सर यांनी शासनाचे आभार मानले आहेत.
– सेंट जाॅर्जेस रूग्णालय, मुंबई.
दि. 12/07/2023.