(दि.26-जानेवारी-2022) 73 वा “प्रजासत्ताक दिन” …

73 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सेंट जाॅर्जेस रूग्णालय, मुंबई येथे आज दिनांक 26 जानेवारी 2022 रोजी सकाळी ठिक 08:00am वाजता सेंट जाॅर्जेस रूग्णालयाचे मा.अधीक्षक डाॅ.आकाश खोब्रागडे सर यांच्या हस्ते राष्ट्र ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले व राष्ट्र गीत गाऊन ध्वजास मानवंदना देण्यात आली. प्रजासत्ताक दिनाच्या या कार्यक्रम प्रसंगी उपअधीक्षक, रूग्णालयातील कार्यरत डाॅक्टर्स, निवासी वैद्यकीय अधिकारी, अधीसेविका मॅडम, गट-अ , गट-ब अधिकारी, प्राध्यापक वृंद, नर्सेस, वर्ग-3 व वर्ग-4 चे कर्मचारी, रूग्णालयाचे सुरक्षा प्रमुख, सुरक्षाकर्मी, विद्यार्थी व इतर मान्यवर उपस्थित होते.

आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून “MS BOY’S FOUNDATION” च्या वतीने सेंट जॉर्जेस रूग्णालयास आकर्षक अशा वृक्ष कुंड्याचे वाटप करण्यात आले. त्यांच्या या कौतुकास्पद उपक्रमाबद्दल रूग्णालयाचे माननीय अधीक्षक डाॅ.आकाश खोब्रागडे सर यांनी “MS BOY’S FOUNDATION” चे आभार मानून त्यांचे अभिनंदन केले.

तसेच सेंट जॉर्जेस रुग्णालयातील आहार विभागातील कर्मचा-यांनी आज प्रजासत्ताक दिना निमित्त रूग्णालयातील कोविड रूग्णांसाठी रूचकर व पौष्टीक अशा विशेष पध्दतीच्या थाळी भोजणाची व्यवस्था केलेली आहे. याबद्दल मा. अधीक्षक डाॅ.आकाश खोब्रागडे सर यांनी आहार विभागातील सर्व कर्मचा-यांचे अभिनंदन करून कौतूक केलेले आहे.

“73 व्या प्रजासत्ताक दिना निमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा” … ! “जय हिंद” …

– सेंट जाॅर्जेस रूग्णालय, फोर्ट, मुंबई – 400 001.